नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – संगीत, नृत्य आणि नाट्य यांची राष्ट्रीय अकादमी असलेल्या संगीत नाटक अकादमीने 6-8 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्लीत झालेल्या आपल्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत 2019,2020,2021च्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांसाठी आपापल्या क्षेत्रात युवा गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या 102 कलाकारांची निवड केली. 40 वर्षांखालील कलाकारांना देण्यात येणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांची सुरुवात परफॉर्मिंग आर्टच्या विविध क्षेत्रातील असामान्य युवा गुणवत्ता लक्षात घेण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि त्यांना राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी झाली होती, जेणेकरून ते अधिक जास्त समर्पित वृत्तीने आणि कलेशी प्रामाणिक राहून काम करू शकतील.
देशाच्या ईशान्य भारतीय राज्यांना देखील यात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असून अरुणाचल प्रदेश, आसाम, मणीपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यातील 19 कलाकारांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे. 25,000/- रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.