महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठित

मुंबई/प्रतिनिधी – जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती  महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर-जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटील, गजानन नामदेव मुंढे, निर्मला सामंत-प्रभावळकर, विकास रावजी सावंत, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्त, पुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्ष, सदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »