Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
थोडक्यात यशोगाथा

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – राज्यातील शहर स्वच्छ व सुंदर दिसावे या संकल्पनेतून शासनाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये एक शासन निर्णय पारित केला होता. त्या अंतर्गत राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये राबविण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचार सुद्धा सहभाग होता. या पालिका हद्दीत कायापालट अभियान राबविले गेले त्याअंतर्गत जलाशय स्वच्छता, सुंदर हिरवे पट्टे, सुंदर पर्यटन स्थळ, वारसा स्थळ यांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. पालिकेने राबविलेल्या उपक्रमांमुळे पालिका प्रशासनाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

या कामांची पोचपावती म्हणून शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये शासनाच्या समितीने क वर्ग महानगरपालिका गटामध्ये केडीएमसीला दुस-या क्रमांकाचे पारितोषिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका चे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, सचिव संजय जाधव यान्हा प्रदान करण्यात आले तर आयुक्तांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X