Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी ठाणे

भारतीय मानक ब्युरोची भिवंडी,उल्हासनगर येथे सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई

नेशन न्युज मराठी टिम.

ठाणे – भारतीय मानक ब्युरोच्या (BIS), मुंबई विभागातील  अधिकार्‍यांच्या पथकाने 22.03.2022 रोजी ठाणे जिल्ह्यातील  भिवंडी येथे “रीसेस्ड एलईडी ल्युमिनेअर्स- ऑफ डाउन लाइट्स/पॅनल लाइट्स” संदर्भात  . IS 10322 : भाग 5 : sec 2 : 2012 नुसार गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या उल्लंघनाची तपासणी करण्यासाठी   सक्तवसुली शोध आणि जप्तीची कारवाई केली.

मे. चेतक एंटरप्रायझेस, उल्हासनगर-421003, ठाणे, महाराष्ट्र यांच्या  आवारात टाकलेल्या छाप्यादरम्यान  18.03.2021 रोजीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान वस्तू (अनिवार्य नोंदणीची आवश्यकता) आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले. IS 10322 : भाग 5 : sec 2 : 2012 नुसार रीसेस्ड एलईडी ल्युमिनेअर्स- ऑफ डाउन लाइट्स/पॅनल लाइट्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

बीआयएस मानक चिन्हाचा  गैरवापर केल्यास बीआयएस कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही  शिक्षा आहेत. या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जात आहे. बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना विकून मोठा नफा कमावला जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

त्यामुळे, सर्वांनी बीआयएस संकेतस्थळाला http://www.bis.gov.in भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्हाचा खरेपणा तपासण्याची विनंती केली जात आहे. नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर झाल्याचे  आढळून आल्यास त्याची माहिती प्रमुख ,  MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय , बीआयएस, मानकालय, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी ( पूर्व), मुंबई – 400 093 यांना कळवावी.  अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील पाठवल्या  जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X