नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नाशिक/प्रतिनिधी– शालेय पोषण आहार कंत्राटी कामगारांनी इगतपुरी तालुक्यातील नाशिक मुंबई महामार्गालगत किनारा हॉटेल जवळ अनोखं आंदोलन सुरू केले आहे. थकीत मानधन त्वरित मिळावे या मागणीसह विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्त्यावरच सरकारची भाऊबीज साजरी करून अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध करत हे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनासाठी पेठ, सुरगाणा, शहापूर, दिंडोरी, मुरबाड, इगतपुरी, हरसुल या तालुक्यातून अनेक कंत्राटी महिला कामगार संघटना एकत्रित येऊन हे आंदोलन सुरू आहे.यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून न उठण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे.