नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अकोला/प्रतिनिधी – सोशल मीडियाचा वापर आज मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अगदी 4 वर्षीय मुलापासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. प्रसिद्धी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर अनेक तरुण-तरुणी उलटसुलट रिल्स पोस्ट करत असतात. पण अकोल्यातील शाळकरी मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन जे केलय ते ऐकून तुम्हाला झटका बसू शकतो. या शाळकरी मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरीसारखा गंभीर गुन्हा केला आहे.
या चोरीत चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही मुलं मौजमजा आणि रिल्स बनविण्यासाठी या गाड्यांचा वापर करायचे. एवढेच नाही तर या शाळकरी मुलांनी 160 च्या वेगाने गाड्या रस्त्यावर पळविल्या. यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुठलाही अपघात झाला नाही. पाचही शाळकरी बालक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अकोला शहरातल्या एमआयडीसी पोलिसांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यॉर्ड मधून आरोपींनी चोरून नेलेल्या एकूण तीन फोर व्हिलर गाडी तसेच दोन मोटर सायकल अशा एकूण 70,000,00 (सत्तर लाख) रुपयांच्या गाडीचा शोध घेऊन एक आरोपीला अटक केली आहे.