महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे महत्वाच्या बातम्या

शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यता अजूनही मिळाली नसल्याने हे कोविड सेंटर रुग्णांना सेवा देण्यापासून आजही वंचित आहे. शेलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शेलार जिल्हा परिषद शाळेत ५० बेड चे सुसज्ज कोविड सेंटर अवघ्या १५ दिवसात ग्राम निधी व लोकसहभागा तून उभारले आहे. मात्र सुसज्ज व सर्व सोयी सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अजूनही मान्यताच दिली नसल्याने हे सेंटर सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी विनाकारण खोडा घालून नागरिकांना कोरोना महामारीसारख्या आजारात वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे ऐन महामारीच्या काळात देखील शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.

या कोविड सेंटरच्या शासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी ,तहसीलदार यांच्या कडे पत्रव्यवहार केला गेला परंतु जिल्हाधिकारी कार्यालयकडे आजही कोविड सेंटर मान्यतेसाठी अडकून पडले आहे. दरम्यान शेलार ग्राम पंचायत हद्दीत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे त्यातच कोरोनाची तिसरी लाट भयानक असल्याचा अंदाज खुद्द आरोग्य यंत्रणांनी वर्तविला असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी या कोविड सेंटरला मान्यता मिळविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता न दिल्यास कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावर उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच किरण चन्ने यांनी दिली आहे.  त्यामुळे ऐन महामारी संकटात सुसज्ज कोविड सेंटर अजून किती काळ प्रशासकीय मान्यत्येसाठी बंद राहणार की अधिकारी लवकरात लवकर त्यास मान्यता देऊन नागरिकांचे जीव वाचविणार हे पाहणे गरजेचे आहे.          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×