महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

सर्पमित्राने दिले अजगराच्या तीन पिल्लांना जीवनदान

कल्याण/ कल्याण ग्रामीण चौरे गाव परिसरातील  फार्महाऊसमध्ये तीन अजगराची पिले शनिवारी आढळल्याने उपस्थितांची भांबोरी उडाली. या तीन पिल्लांना सर्प मित्रांनी जीवनदान दिले आहे.चौरे गावानजीक कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा फार्महाऊस असुन शनिवारी सकाळच्या सुमारास तीन अजगराची पिले आढळल्याने उपस्थितांची भितीने धांदल उडाली. चंद्रकांत जोशी फार्म हाऊसचे केअर टेकर यांनी प्रसंगवधान दाखवित तीन अजगराच्या पिल्लांना पकडून  ठेवले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल करून घटनास्थळी बोलविलेव तिन्ही अजगराच्या पिल्लांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याकडे सर्पुद केले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी वनपाल एम डी जाधव वनपाल यांना कळवले व त्यांच्या देखरेखीखाली तिन्ही अजगराच्या पिल्लांना जीवनदान देत जंगलात नैसर्गिक आधिवासात सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×