नेशन न्यूज मराठी टीम.
भिवंडी / प्रतिनिधी – आगरी ग्रंथालय चळवळी द्वारे दि.२६ ऑगस्ट रोजी भिवंडी येथील दिंडीगड येथे पावसाळी आगरी साहित्य संमेलन होणार आहे ज्यात युवा अन ज्येष्ठ आगरी साहित्यिकही सामील होणार आहेत.
आगरी बोलीभाषा, आगरी साहित्य जतन व्हावे तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्या आगरी ग्रंथालय उभे राहून त्या द्वारे वाचन-लेखन संस्कृती उभी रहावी यासाठी युवा साहित्यिक सर्वेश तरे, गीतकार-संगीतकार दया नाईक आणि चित्रकार, आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, साहित्यिक प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळीची सुरवात केली. आगरी ग्रंथालय संकल्पना प्रत्यक्षात मुर्त स्वरुपात डोंबिवलीत निळजे येथे सर्वोद्य महाविद्यालयाचे महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून झाले अन ठाणे कळवा येथे सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवी यांच्या प्रयत्नातून सुरु झाले. त्यानंतर या आगरी ग्रंथालय चळवळीमार्फत अनेक साहित्यिक कार्यक्रमे आयोजित करण्यात आली.
नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेत द्वितीय वर्षाला ‘आगरी’ भाषेचा विषय अभ्यासा साठी सुरु करण्यात आला आहे. खास करुन त्या विद्यार्थ्यांनी या साहित्यसंमेलनात सामील व्हावे अनं आगरी भाषा-साहित्याचे विविध पैलु जाणून घ्यावे असे आवाहन आगरी ग्रंथालय चळवळीचे दया नाईक यांनी केले आहे. हे पावसाळी साहित्य संमेलन श्रावण मासाचे आगमाचे स्वागताकरीत असून ह्या समेंलनाचे आगरी नाव ‘सरावनसरी’ म्हणचे श्रावणसरी असे योजिले आहे. ‘सरावनसरी’ ह्या आगरी साहित्य संमेलनात काव्यसंमेलन, आगरी भाषेवर परिसंवाद, भाषा अभ्यासकांसोबत प्रश्न-उत्तरे असे विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याचे आगरी ग्रंथालय चळवळीचे मोरेश्वर पाटील यांनी कळविले आहे.