महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर चर्चेची बातमी

युपीएससी परीक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पुणे/प्रतिनिधी – नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेने यशाचा ठसा उमटला आहे. सारथी या संस्थेने प्रायोजित केलेल्या उमेदवारांना यश मिळाले आहे.

संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले आहेत. सारथीमार्फत युपीएससीकरिता लाभ घेऊन २०२३ या वर्षात यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक क्रमांक व नावे पुढीलप्रमाणे –

१२२ विनय सुनील पाटील (नाशिक), १४७ आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), २२४ ठाकरे ऋषिकेश विजय (अकोला), २५८ शामल कल्याणराव भगत (पुणे), २६७ उन्हाळे आशिष विद्याधर (बुलडाणा),२८७ निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (पुणे), ३०८ घोगरे हर्षल भगवान (पुणे), ३५९ शुभम भगवान थिटे (पुणे), ३९५ अंकित केशवराव जाधव (हिंगोली), ४१४ खिलारी मंगेश पराजी (अहमदनगर), ४९६ पाटील लोकेश मनोहर (जळगाव), ५३१ मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), ६०४ आविष्कार विजय डेले (नाशिक), ६१० केतन अशोक इंगोले (वाशिम), ६२२ देशमुख राजश्री शांताराम (अहमदनगर), ७०६ निकम सुरज प्रभाकर (नाशिक), ७३२ कुणाल संजय अहिरराव (नाशिक), ७५९ गौरी शंकर देवरे (पुणे), ८३७ शुभम उत्तमराव बारकाळे(नाशिक), ९७६ श्रावण अमरसिंह देशमुख (सातारा), हे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

युपीएससी सारख्या स्पर्धा परीकक्षेसाठी बरेच विद्यार्थी जास्त पैसे भरून अभ्यासिका लावतात. पण गरीब घरातील मुला-मुलींना ते परवडण्यासारखे नसते आणि म्हणूनच अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांची सारथी मदत करते, त्यांना योग्य ते मार्गदर्शन देते. सारथी ने आजपर्यंत अनेक अधिकारी घडवले आहेत. सारथी संस्थेने घडवलेल्या अधिकाऱ्यांचा देशसेवेत महत्वाचा वाटा आहे.

Related Posts
Translate »