कल्याण/प्रतिनिधी – पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना महिला आघाडी सरसावली असून कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा उभारण्यासाठी भांडी, धान्य, कपडे आणि इतर साहित्यांची मदत करण्यात आली आहे.मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला अक्षरशः झोडपून काढलं. नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगली सातारा कोल्हापूर, चिपळूण, महाड आदी शहरातील हजारो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर या नागरिकांना मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कल्याण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला असून महिला आघाडीच्या वतीने धान्याच्या किटसह गॅस शेगडी, रोजच्या वापरातील भांडी, कपडे असे आठ टन साहित्य पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाड येथे रवाना करण्यात आलें.
यामध्ये ५ किलो तांदुळ, ५ किलो गहाचे पीट, २ किलो साखर, १/४ किलो चहापावडर,१/४ किलो मिरची, १५० ग्रा. हळद पावडर, १ किलो तेल, १ किलो मीठ, १ किलो तुरडाळ , बिस्किट, फरसाण,२ किलो कांदे, २ किलो बटाटे, कोलगेट, ब्रश, खोबरेल तेल, विम बार, रिन बार, लाईफ बॉय साबण, गॅस शेगडी,३ पातेले (टोप), तवा, पोळपाट लाटणे, पक्कड, भातवाडी, डाव, छोटे चमचे, भाजी कटर, बादली-मग, २ ग्लास, २ ताट व वाटी, चहाची गाळणी, कलथा, मेणबत्ती व माचिस, लायटर, फिनेल, २ टीशर्ट, २ पॅन्ट, २ साडी, २ पेटीकोट, लेडीज वेअर,२ गाऊन, २ चादर, २ ब्लॅन्केट, १ चटई, २ चप्पल सेट, सॅनटरी नॅपकिन, छोट्या मुलांचे कपडे आदींचा समावेश आहे.
हे सर्व साहित्य आमदार भरत गोगावले यांच्याकडे पूरग्रस्तांना देण्यासाठी सोपविण्यात आले असून महाड तालुक्यातील तळीये कोंढाळकर वाडी, बारसगाव, समर्थनगर ढाळकाठी, नांगलवाडी, काळीजकोंड आदिवासी वाडी, बिरवाडी आदी गावांमध्ये वितरीत करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांनी दिली.
दरम्यान हि मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांना पर्यंत पोहोचविण्यासाठी सुनिता लेकावळे, मीना माळवे, रंजना पाटील, सुनीता ढोले, मीनल कांबळे, विद्या चौधरी, सुष्मा रसाळ, नमिता साहू, रचना मालुसरे, दीपाली शहाणे, राधिका गुप्ते, आशा रसाळ, सीमा वेधपठाक, राणी करांडे, रेखा खरुळे, समीर वेधपठाक, राजेंद्र गुप्ते, दिगंबर ठाणगे, केदार गावडे, गणेश शिंगोटे, संजय जाधव, सुनील रसाळ, सुशांत भोईर, पंकज पवार, विकास मिटकुटे, ढोले काका आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.