नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – देशभरात गुन्ह्यांची शंभरी पार केलेल्या आणि मोक्का कायद्याअंतर्गत चार गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या सराईत इराणी आरोपीस धारवाड, कर्नाटक येथुन अटक करण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना यश आले असून कासीम मुख्तार ईराणी उर्फ तल्लफ, वय २४ वर्षे, रा. आंबिवली असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जबरी चोरी (चेन स्नॅचींग), मोटारसायकल चोरी तसेच खुनाचा प्रयत्न असे तब्बल शंभर गुन्हे देशभरात दाखल आहेत.
ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई तसेच परीसरात चेन स्नॅचींग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडत असतांना हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरीष्ठांकडुन आदेशीत करण्यात आले होते. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी कासीम मुख्तार ईराणी उर्फ तल्लफ याने परिसरात चेन स्नॅचींग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे करुन धुमाकुळ घातला होता. हा आरोपी नेहमी जागा बदलुन राहत असल्याने त्याचे ठावठिकाण्याबाबत निश्चीत माहिती मिळत नव्हती.
खडकपाडा पोलीस ठाण्यास हा आरोपी धारवाड, कर्नाटक येथे असल्याबाबत माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे पथक धारवाड, कर्नाटक येथे रवाना करण्यात आले होते. इंदिरानगर, आझाद रोड, अलनवर, जि. धारवाड, कर्नाटक येथे एका घरामध्ये आरोपी कासीम मुख्तार ईराणी हा असल्याचे समजताच ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सपोनि अनिल गायकवाड व पथक यांनी आरोपी असलेल्या घराच्या भोवती स्थानिक पोलीसांचे मदतीने सापळा रचला. आरोपीने घराचे कौले उचकटुन, शेजारील इमारतीचे गच्चीवरुन उडया मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने आरोपीचा पाठलाग करुन शिताफिने त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी झालेल्या धावपळीत तीन पोलीस अंमलदार किरकोळ जखमी झाले.
अटक करण्यात आलेल्या कासीम ईराणीकडे चोरी केलेल्या ५ मोटारसाकल तसेच एक अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले असून त्याच्यावर १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत चार गुन्हयातील पाहिजे आरोपी असुन इतर २५ ते ३० गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे आरोपी आहे.
हि कौतुकास्पद कामगिरी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, तपास पथकाचे अधिकारी सपोनि अनिल गायकवाड, व तपास पथकाचे अंमलदार सहा. पो.उप निरी. मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, पोशि राहुल शिंदे, नवनाथ बोडके, अनंत देसले, कुंदन भाचरे, अविनाश पाटील यांनी केली आहे
Related Posts
-
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी…
-
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिडको पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या…
-
परराज्यातून मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/BgSDyM-bWes?si=12XjOmmxDOiyJGU5 मुंबई/प्रतिनिधी - परराज्यातून मुंबईत…
-
डोंबिवलीत दोन सराईत सोनसाखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - भिवंडीतील दोन तरूण कल्याण-डोंबिवली…
-
सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी…
-
मानपाडा पोलिसांकडून ५ आरोपींना अटक,११ गुन्ह्यांची उकल करताना ४.४० लाखांचा ऐवज हस्तगत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - मानपाडा पोलिसांनी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या 5 अट्टल…
-
भिवंडीत घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत चोरट्यांना अटक, ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही जप्त
भिवंडी/प्रतिनिधी - अनलॉक काळात भिवंडीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांनाच नारपोली…
-
गावठी पिस्टलसह एकला अटक
रत्नागिरी/प्रतिनिधी - गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला चिपळूण पोलीसांनी अटक केली…
-
प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कल्याण/प्रतिनिधी - प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात…
-
वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक
प्रतिनिधी. पुणे - पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या…
-
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
कुख्यात दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर…
-
सराईत चोरांना वाशी पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबईतील वाशी…
-
सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा हस्तगत
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे शहरातून…
-
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगाराला पनवेल मध्ये अटक
नेशन न्यूज मराठी टीम. पनवेल/प्रतिनिधी - उत्तरप्रदेश आजमगढ़ मध्ये 33…
-
अवैध दारूच्या साठ्यासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - मध्यप्रदेश मधून…
-
अंमली पदार्थाच्या मोठ्या साठयासह दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - किनारपट्टीवरील लोकांसाठी…
-
जीएसटी चुकवून फसवणूक करणाऱ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर…
-
कल्याणात मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण येथील एपीएमसी मार्केट परिसरात बुधवारी सकाळी चार…
-
फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पूर्व…
-
तीन गावठी कट्ट्यासह,दोन आरोपींना चोपड्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - चोपडा ग्रामीण…
-
एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील…
-
जामनेरच्या भोंदू बाबाला धुळ्यात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - भविष्य सांगण्याचा…
-
भिवंडीत नगरसेवक ५० लाखाची लाच घेताना अटक
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी महानगरपालिकेचे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांना…
-
रानडुकराची शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - रानडुकराची शिकार करून…
-
प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणारे सराईत चोरटे गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण रेल्वे स्थानक…
-
पोलिस हवालदाराला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. सोलापुर/प्रतिनिधी - बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस…
-
केडीएमसीतील क प्रभाग अधिकारी,कर्मचारी लाच घेताना अटक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह…
-
१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
-
गोंदिया गोळीबार प्रकरणात ७ आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - 'राइस सिटी' म्हणून…
-
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला दिल्लीत अटक
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ / प्रतिनिधी - एकतर्फी प्रेमातून…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात १० आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीच्या नांदगाव पेठ…
-
८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…
-
कल्याणात महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - अल्पवयीन मुलांच्या मदतीने…
-
महाराष्ट्रासह परराज्यात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
अमरावती/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घरफोड्या काही केल्या…
-
वायरल व्हिडीओच्या मदतीने सराईत मोबाईल चोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मध्ये मागील काही…
-
घरफोड्या करण्याऱ्या सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/-NydJhPQU9M डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली मानपाडा…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
कोतवाल परिक्षेत आढळला डमी परीक्षार्थी, डमी परीक्षार्थ्याला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाण्यात कोतवाल पदाच्या परीक्षेसाठी…
-
सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
नवी मुंबई/प्रतिनिधी - सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांना चुना लावणाऱ्या…
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
तांबापूर परिसरातील खून प्रकरणी फरार संशयित महिला अटक
जळगाव/प्रतिनिधी - जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
डोंबिवलीत देह व्यापाराचा भांडाफोड, पाच दलालांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - ५ ऑक्टोबर रोजी या…
-
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या…
-
अहमदनगर एक कोटी लाच प्रकरण,एमआयडीसी कार्यकारी अभियंत्याला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर येथील एक…
-
पतसंस्थेच्या प्रशासकाला पाच लाख लाच घेताना रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/iUK5uHh8E6A धुळे/ प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील…
-
बांधकाम विभागानी केलेल्या कामांची एसआयटी चौकशीसाठी वंचितचे उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - सामाजिक न्याय…