महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील १२ कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 12 कलावंताचा समावेश आहे.

पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी   ‘अकादमी रत्न सदस्यता’  या संगीत अकादमीच्या  मानाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

यासह राज्यातून नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील त्यांच्या सर्वंकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार पांडुरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी नर्तक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समकालीन नर्तक भुषण लकंद्री  यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सन 2019, सन 2020 आणि सन 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून एकूण 128 कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात विविध कला क्षेत्रातील 50 महिलांचा समावेश आहे. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप  1 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.

वर्ष 2019 साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना त्यांच्या योगदानासाठी सन 2019 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

सन  2019 साठीचे सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

सन 2020 साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना सन 2020 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत श्री. दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान आहे. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुटुंबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते महाराष्ट्रातील, भारतातील वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाट्य प्रेमी यांचाही या पुरस्कारात तितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.

सन 2020 साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार  मीना नाईक  यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला.

सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख परंपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा सन 2020 साठी पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी सन 2020 चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समकालीन नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2021 साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »