नेशन न्यूज मराठी टीम.
मराठवाडा / प्रतिनिधी – मराठवाड्याचे मागासलेपण दूर व्हावे व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी महाराष्ट्रापासून वेगळे होऊन स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती व्हावी, या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीने संपुर्ण मराठवाड्यात ९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट जनजागृती रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा आज कळंब शहरात आली असता संयुक्त महाराष्ट्रासाठी संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवत आक्रमक आंदोलन केले.
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपाचा डाव असून संभाजी ब्रिगेड हे कदापी होऊ देणार नाही. राजकीय स्वार्थासाठी असे कृत्य करणाऱ्यांचा कायम विरोध करेल, असे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यांनी सांगत मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी स्वतंत्र करावा नाही तर मराठवाड्याच्या राज्यकर्त्यांना जाब विचारावा, असे म्हटले.