नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – आज १ आक्टोंबर म्हणजे महार रेजिमेंट स्थापनेचा 83 वा वर्धापन दिन. माजी सैनिकांकडून हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो.महार रेजिमेंटला देशात मोठ्या मानाचे स्थान आहे.महार रेजिमेंट इतिहास हा मोठा गौरवशाली इतिहास राहिला आहे .देश सेवेसाठी महार रेजिमेंटचे मोठे योगदान आहे. देशावर आलेल्या मोठ मोठ्या संकटावर विजय प्राप्त करण्यासाठी या रेजिमेंटणे प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आजचा दिवससंपूर्ण देशवासीयांना साठी मोठा अभिमानाचा दिवस आहे.
यामुळेच या दिवशी बुलढाण्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाण्यात यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने सैनिकांच्या सन्मानात सैनिक सन्मान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. गांधी भवन येथून सैनिक सन्मान मोटारसायकल रॅलीची सुरुवात करून शहरातील स्टेटबँक चौक, तहसील चौक, त्रिशरण चौक होत या रॅली चे समापण विजय नगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माजी सैनिकांडून मानवंदना देण्यात आली. दरम्यान रॅलीमध्ये महार रेजिमेंटचा विजय असो, भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या.