नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण –शिवकालीन गडतोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण अंबरनाथ विभागासह महाराष्ट्र तील मावळ्यांनी नवसंजीवनी दिली. नाशिक जवळील मुल्हेर गडाच्या जंगलात कित्येक वर्षांपासून पडलेल्या गडतोफांना कल्याण च्या दुर्गसेवकांनी गडावर नेत विराजमान केले.
मुल्हेर गड हा नाशिक पासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेला इतिहास काळातील एक अतिमहत्त्वाचा किल्ला नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेला आहे. इतिहास चाळून पाहिला तर गडांचे रक्षण करण्यासाठी “शिवप्रसाद” आणि “रामप्रसाद” अशा दोन तोफा स्थानापन्न होत्या असे दिसून येते. पण जसजसा काळ ओसरला दिवस पुढे सरकले तसं तसं ज्या तोफांनी गडाचे रक्षण केले त्या तोफांचे पतन होण्यास सुरुवात झाली. कित्येक वर्षे गडाची सेवा करून झाल्यानंतर या तोफा सुमारे दोनशे वर्षेपासून गडाच्या खाली असलेल्या दरीत पडून होत्या. कित्येक वर्षांपासून दरीत कोसळलेल्या ह्या दोन्ही तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण विभागाने राज्यातील इतर तालुक्यातील दुर्गसेवकांना घेऊन दरीत पडलेल्या या तोफा पुन्हा गडावर विराजमान करून त्यांना नवसंजीवनी मिळवून देऊन एक इतिहास रचला.
तोफांचा अभ्यास केला तर एक एक तोफांचे वजन हे सुमारे दोन हजार किलो आहे. पण सह्याद्री प्रतिष्ठानच्या शेकडो दुर्गसेवकांनी एकीचे बळ दाखवत ह्या तोफा पुन्हा गडावर विराजमान केल्या. या तोफा विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत ह्यांनी विशेष सहकार्य केले. तोफांचे वजन पाहता पुर्ण दिवसाची मेहनत असल्याने जमलेल्या दुर्गसेवकांनी सुमारे १५ तास अन्न पाण्याचा त्याग करून दुर्गसेवेचा हा वसा पूर्ण करून गडावर पुन्हा तोफा बसवल्या.
Related Posts
-
सह्याद्री अतिथीगृहावर विविध धर्मिय प्रतिनिधीच्या बैठकीचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक…
-
चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू- मनोज जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
मतदारांनी शिवसेनेची लायकी दाखवून दिली भाजपा आ.गणपत गायकवाड यांची टीका
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने उत्तर…
-
'सह्याद्री' युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्ये सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
श्रीसदस्यांना सरकारने हिटलर प्रमाणे वागणूक दिली, 'आप'ची सरकार वर टीका
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - खारघर मधील घटनेने…
-
ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल होणार,राज्य शासनाने दिली मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार…
-
भूमिपुत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी ही संधी दिली - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - गेल्या ७४ वर्षांचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला…
-
जनतेने दोन वेळा संधी दिली तिसऱ्यांदा रस्त्यावर आणले सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांना टोला
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे…
-
शिवकालीन पेहरावात चिमुकल्यांची शिवजयंती साजरी
प्रतिनिधी :- कल्याण मधील चांम्स किड्स प्री स्कूल च्या वतीने…
-
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय आणि मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलला दक्षिण कमांडच्या प्रमुखांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - लेफ्टनंट जनरल जे एस…
-
आयएनएस सुमेधने बाली, इंडोनेशियाला दिली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या आग्नेय…
-
नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सिंगापूर - नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग…
-
आयएनएस सुनयना जहाजाने दिली दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदलाच्या सुनयना जहाजाने …
-
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल औषध कंपनीला दिली भेट
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय आरोग्य…
-
बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्याकरिता पीसीव्ही लस दिली जाणार
मुंबई/प्रतिनिधी - बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण…
-
ठाण्याची केंद्रीय पथकाची पाहणी प्रतिबंधित झोन,कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट
प्रतिनिधी. ठाणे - कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय…