नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्यिकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये (1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 ) या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.
मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कवियत्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादामीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांच्या हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवियत्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रीया दिली.’ कुटूंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगुन आपल्याला जे आवडत ते लिहीण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगितले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटींग मध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50 नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटींग आणि कॉपीरायटींग त्यांनी केलेलं आहे.
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.)विलास पाटिल यांचा समावेश होता.
सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आंनद’ या मराठी बाल कविता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिहित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’
साहित्यिक आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाटयछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्यिकांचा समावेश होता.
Related Posts
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रसिध्द लेखिका संगीता…
-
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - अतिशय प्रतिष्ठित समजला…
-
‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार तर आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी
नवी दिल्ली -प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष…
-
पुण्यात“कलम आणि कवच संरक्षण साहित्य महोत्सव संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पेंटॅगॉन प्रेस आणि…
-
साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार लेखिका सई परांजपे यांना प्रदान
नवी दिल्ली- प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग…
-
महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन युवा…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी,…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील…
-
अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका,…
-
महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - होमगार्ड (एचजी) आणि नागरी…
-
बार्डो चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दिल्ली प्रतिनिधी - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर
सोलापूर/अशोक कांबळे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली- युवा लेखक प्रणव सखदेव…
-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला पोर्टर प्राईज २०२३ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः…
-
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात भरले बाल साहित्य संमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी…
-
मेघालय,नागालँड आणि त्रिपुरा विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरा विधानसभा निवडणूकीसाठी…
-
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली/प्रतिनिधी - ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे…
-
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर…
-
‘विज्ञान प्रगती’ या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मासिकाला राजभाषा कीर्ती पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक…
-
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात
नाशिक/प्रतिनिधी- कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात…
-
शिक्षक साहित्य संमेलनातर्फे मनिषा कडव यांना पुरस्कार प्रदान
मुंबई प्रतिनिधी- शिक्षक व शिक्षकेतरांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
नगरपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी नागरी साहित्य लेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नागरी भागात कार्यरत…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी वंजारी महिला शाखेतर्फे पारंपारिक गीतांचा कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा…
-
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
दहावी, बारावीच्या परीक्षांची तारिख जाहीर
प्रतिनिधी. मुंबई - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावीची) लेखी परीक्षा…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…