नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकडून सर्वच ठिकाणी अभिवादन करण्यात आले. महारष्ट्रात सर्वच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यात आले. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी अभिवादनाचे बॅनरदेखील लावण्यात आले आहे. कल्याण शहरामध्ये लावलेल्या एका वेगळ्या बॅनरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले व शहरभर या बॅनरचीच चर्चा होती.
साहेब मी गद्दार नाही गेलेल्या 40 गदारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल अश्या आशयाचे बॅनर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यलया समोर लावण्यात आला होता त्यानंतर या बॅनरची चर्चा हि शहरसह सोशल मिडीयावर चागलीच रंगली होती. अखेर या बॅनरच्या आशयामुळे काही वाद निर्माण होऊ नये म्हणून पालिका व पोलिस प्रशासना कडून या बॅनर वर कारवाई करत हा बॅनर हटविण्यात आला.