Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड रुग्णालयात 37 वर्षाची एक 7 महिन्याची गरोदर महिला रुग्ण ॲडमिट होती. सदर महिला रुग्णाची प्रकृती क्रिटीकल असल्यामुळे तसेच तीचे सॅच्युरेशन कमी असल्यामुळे तीला आय.सी.यू. वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर महिलेची नैसर्गिक प्रसुती होवून तीने एका नवजात बालकास जन्म दिला आहे. सदर समयी महिलेची तपासणी स्त्रीरोगतज्ञा मार्फत करण्यात आली. महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालयात महिलेची सुखरुप प्रसुती होण्याची ही पहिलीच घटना आहे. नवजात बालकाचे वजन कमी असल्यामुळे त्यास लहान मुलांच्या रुग्णालयात (NICU) दाखल करण्यात आले आहे. सदर गंभीर असलेल्या महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती आर्ट गॅलरी, लाल चौकी येथील कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अमित गर्ग, डॉ. मुशिर, डॉ. संदिप इंगळे इ. च्या देखरेखीखाली झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X