नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – वैजापुर येथे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व पिक करपून गेले आहे. त्यातच केंद्र सरकारने कांदयावर निर्यात शुल्क आकारल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत आहेत, तसेच पाऊस न आल्यामुळे पाणी प्रश्न, चारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागे जाहीर केलेले कांदा अनुदान, पिक विमा, सतत च्या पावसाची नुकसान भरपाई, जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये तत्काळ जमा करावे.म्हणून महाराणा चौक ते तहसील कार्यालय रुमणे आंदोलन करण्यात आले.
यावेळेस बोलताना अजय पाटील साळुंके म्हणाले शेतकर्यांना विम्याचे पैसे मिळाले, नाहीतर हे रुमणे कुठे घुसेल तुम्हाला कळणार नाही. आज शेतकऱ्यांसमोर प्रश्नच प्रश्न आहेत. उत्तर कोण देणार? जर उत्तर दिले नाही तर आंदोलन शांततेत नसेल. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे अजय पाटील व साळुंके म्हणाले.