महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी यशोगाथा

भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला आरटीओ

नेशन न्युज मराठी टिम.

बीड -वडिलांनी 40 वर्ष भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाचे शिक्षण केलं तर आईनी मंजूरी करून कुटुंबाचा गाडा चालवला तीन मुलांची शिक्षण कसेबसे करून मोठ्या मुलाला आरटीओ बनवण्याचं पराक्रम आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील भंगार विक्री करणाऱ्या सुदाम गाडे यांच्या कुटुंबांनी करून दाखवला आहे अशाच या कुटुंबाची ही यशोगाथा.

आष्टी तालुक्यातील वटणवाडी निमगावच्या मध्यभागी असलेल्या झोपडपट्टी परिसरात राहणारे सुदाम गाडे कुटुंबात तीन मुले पत्नी आणि सुदाम गाडे असे पाच जणांचे कुटुंब गाडेनी चाळीस वर्षापासून भंगार विक्रीचा व्यवसाय करत आपल्या मुलांचे शिक्षण केले दादासाहेब गाडे यांनी पहीली ते दहावी कानिफनाथ विद्यालय निमगाव येथे केले तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम जुनियर कॉलेज कडा तर मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण विखे-पाटील इंजीनियरिंग  कालेज  अहमदनगर येथे पूर्ण केले तर पुढे काही दिवस नारायणगाव येथे एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत हे काम करत असताना वेगवेगळ्या परीक्षा देण्याचा अभ्यास केला गतवर्षी झालेल्या एमपीएससी परीक्षा दिली त्याचा निकाल काल परवा लागला यात देशात 23 तर महाराष्ट्रात 66 तर एसटी प्रवर्गातून महाराष्ट्रमध्ये तिसरा येण्याचा मान दादासाहेब गाडे यांनी मिळवला आहे

माझ्या आईवडिलांनी केलेले कष्ट यांची जाण ठेवून अभ्यास केला सहाय्यक मोटर वाहतूक निरीक्षक म्हणून मी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षेमध्ये सर्व आई-वडील शिक्षकांनी मला घडवले त्यामुळे हे शक्य झाले असे त्यांनी सांगितले. दादासाहेब गाडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
याबाबत वडिलांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया देताना सांगितलं की एक दिवस असा होता की माझ्याकडे मुलांना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते पण बायको रातभर भाडली मी सकाळी उठून बाहेर गेलो मित्रा पाया पडून कसे बसे पैसे घेऊन दुकानातून कपडे आणले त्यानंतर मुलं शाळेत गेले यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. 
एवढी प्रतिक्रिया देताना दादासाहेब शेतामध्ये काम केलं वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय केला भावांनी मिस्तरी च्या हाताखाली जाऊन पैसे कमवू या पैशातून मुलाला शिकवलेल्या कामाचं चीज झालं आज काय सांगू इतका आनंद झालाय ते सांगता येत नाही.
याबाबत गावातील माजी उपसरपंच विजय शेळके यांनी सांगितले की एका भंगार विक्री करणाऱ्या कामगाराचा मुलगा जर आरटीओ होत असेल तर दुसऱ्या युवकांनी सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे याचा एक आदर्श दादासाहेब गाडे यांनी आमच्या गावातील तरुणांसमोर निर्माण केला आहे त्यामुळे मला तर दादासाहेबचा अभिमान वाटत आहे हे आता आमच्या गावच भूषण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×