Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
अर्थसत्ता

आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपये मदत

प्रतिनिधी.

मुंबई – महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष विनोद पाटील आणि पी. टी. अहिरे यांनी आज मंत्रालयात कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.

संघटनेने आपल्या संदेशात म्हटले आहे की, सध्या कोरोना संकटाचा सामना संपूर्ण जग, देश आणि आपले राज्य करत आहे. या संकटामधून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन व्यापक प्रयत्न करत आहे. राज्याच्या प्रशासनाचा घटक म्हणून आयटीआय निदेशक संघटना आणि त्याचे सर्व सदस्य आपल्या परीने योगदान देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात येत आहे. यापुढील काळातही संघटना आणि त्याचे सर्व सदस्य या संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देतील.

संघटनेचा नुकताच ४९ वा वर्धापनदिनही साजरा होत आहे. याचे औचित्य साधून ही मदत करण्यात आली. कौशल्य विकासमंत्री श्री. मलिक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Translate »
X