नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – एपीएमसी मार्केट परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एपीएमसी मार्केट परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. तर यामधील त्यांचे तीन साथीदार फरार झाले आहेत .
पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत.आजीम गाझी ,अरफात शेख उर्फ काल्या ,अन्वर शहा ,अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झाले आहेत. अटक झालेल्या चार दरोडेखोरांकडून पोलिसांनी तीन चाकू, एक मिरची स्प्रेची बॉटल, नायलॉनचे रस्सी ,रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे.