नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – निर्जन स्थळी अंधारात मदतीसाठी कुणीतरी हाक देऊन आपली दुचाकी थांबवतो.आणि आपणही मदत देवू इच्छित असताना, तोच वाटसरू अचानक आपल्यावर हल्ला करतो. त्यामुळे निर्जन स्थळी मदतीसाठी गाडी थांबवणे हे देखील आता धोक्याचे झालेले आहे. असाच एक प्रकार धुळे येथे घडला आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात लिफ्ट मागण्याच्या बहाने मारहाण करत लुटमार करणाऱ्या दोघांच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. लुटीतील दुचाकी व रोकड जप्त केली गेली आहे. यातील मुख्य संशयित आरोपी फरार असून लवकरच त्यालाही जेरबंद करणार असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंग येथील भुयारी मार्गाजवळ हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी सायंकाळी कामानिमित्ताने फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात दोघांनी लिफ्ट मागण्याच्या बहाने वाहन थांबवले. व फिर्यादी व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील पैसे, मोबाईल व दुचाकी लुटून हे आरोपी पसार झाले होते. याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील दोघा आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यातील लुटलेली दुचाकी व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केली. यातील एक आरोपी फरार असून त्याच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.