महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

रस्ता दुरुस्तीचे काम, ठाकुर्ली उड्डाणपूल २१ आणि २२ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी राहणार बंद

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या उतार मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामूळे या रस्त्याची दुरुस्ती आणि मास्टेक अस्फाल्टच्या ( डांबराचा जाड थर) कामासाठी उद्या 21 फेब्रुवारी आणि परवा 22 फेब्रुवारी 2022 रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. डोंबिवली शहर वाहतूक पोलीस उपविभागातर्फे याबाबत सूचना देण्यात आली आहे.

ठाकुर्ली उड्डाणपुलावरील उतार रस्त्यावर खड्डे पडल्याने दररोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्याच्या दुरुस्ती आणि मास्टेक अस्फाल्टच्या (डांबराचा जाड थर) काम करण्यासाठी 2 दिवस लागणार असल्याचे केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उद्या आणि परवा असे दोन दिवस हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग…
पूल बंद राहणार असल्यामुळे घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा, टिळक पुतळा मार्गे सावरकर रस्ता, नेहरू मैदान रस्ता मार्गे ठाकुर्ली उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स. वा. जोशी हायस्कूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
या मार्गाने येणाऱ्या वाहन चालकांनी टिळक पुतळा येथून पाटणकर चौक (चार रस्ता) गिरनार चौक, म्हाळगी चौक, एस के पाटील शाळा मार्गे कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पश्चिमेकडे जावे.

ठाकुर्ली गाव, ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांना नाना कानविंदे चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी कानविंदे चौक येथून फडके रोड. इंदिरा चौक. ग्रीन चौक येथे उजवे वळण वि. शा. चिपळूणकर मार्ग. वा. दी. जोशी चौक. एस के पाटील शाळा येथून कोपर उड्डाण पुलाने डोंबिवली पश्चिमेत जाता येणार आहे.

डोंबिवली पश्चिम येथून ठाकुर्ली पुलाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बावन चाळ येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी बावन चाळ येथे उजवे वळण घेऊन महात्मा गांधी रोड, भावे सभागृह रस्त्याने पंडित दिन दयाळ चौकातून कोपर उड्डाणपूल मार्गे डोंबिवली पूर्व भागात येता येणार आहे.त्यामुळे पुढील 2 दिवस सर्व वाहन चालकांनी या आदेशाचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन डोंबिवली शहर वाहतूक उपविभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×