सोलापूर/अशोक कांबळे – स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी.यासाठी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी काही काळासाठी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटीशन मध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती ,जिल्हा परिषद,नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका मधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागावर परिणाम होत आहे.त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे.मंडल आयोगाच्या ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे.त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.सध्या उध्दभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरीत कार्यवाही करून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे असे निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर आण्णा लिंगे,समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे,महाराष्ट्र सदस्य दिलीप भुजबळ,समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब खारे,जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल अभंगराव,समता परिषदेचे सोलापूर शहर अध्यक्ष शशिकांत बापू कांबळे,मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी,ता.शहर अध्यक्ष लक्ष्मण माळी,तालुका उपाध्यक्ष रफिक आत्तार, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी भानवसे, पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, तेलंगवाडीचे सरपंच पांडुरंग माळी, अवधूत माळी, अमोल ननवरे, पांडुरंग माळी, अतुल माळी, श्रीनिवास नामदे, पुंडलिक माळी, पांडुरंग येळवे, बजरंग शेंडेकर, सुरेश माळी, सुभाष ननवरे, पोपट वसेकर, बालाजी माळी, राजकुमार आढेगावकर, विठ्ठल कोळी आदी सहभागी झाले होते.यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.