Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

दलित आदिवासी व महिलांवरील अत्याचार थांबिण्याची रिपाइं युवक आघाडीची मागणी

कल्याण/प्रतिनिधी –  महाराष्ट्र राज्यामध्ये महीला व दलित आदिवासी अत्याचारात वाढ होत असुन हे अत्याचार थांबविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीने केली असून यासह इतर विविध मागण्यांसाठी  रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया कल्याण शहर युवक आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व अण्णा रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी नगरसेवक भीमराव डोळस, कुमार कांबळे, संग्राम मोरे, संतोष जाधव, राहुल कांबळे, नरेंद्र मोरे, गणेश कांबळे, जालिंदर बर्वे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रिपाइं युवक आघाडीने दिलेल्या निवेदनात दलित आदिवासी व महीलांवर होणारे अत्याचार थांबविणे. सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करावा. ओ.बी.सी., मराठा व सर्व जातिनिहाय जनगणना करून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे नोकरी, शिक्षण तसेच व राजकीय आरक्षण मिळावे. अतिवृष्टी मध्ये ज्या शेतक-यांचे पिकाचे नुकासान झालेले आहेत, अश्या शेकत-यांना आर्थिक मदत मिळावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करून त्वरीत मिळावी. रमाबाई आवास योजनेमार्फत सर्व झोपडपट्टी धारकांना घरांचा लाभ मिळावा.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील झोपडपट्टयांचे सर्वे करून त्यांचे एस.आर.ऐ, बी.एस.यु.पी मार्फत पुर्नवसन करावे. अटाळी-आंबिवली तसेच रेतीबंदर कल्याण प. येथील रिंगरूट मध्ये बाधिंताचे पुर्नवसन करण्यात यावे. येणा-या लोकसभा विधानससभा व स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये ज्या त्या जातीच्या निकषाप्रमाणे राखीव मतदार संघ वाढवुन मिळावे. सुशिक्षित बेकारांना कमीत कमी पाच हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे. देशामध्ये मराठा समाजास त्यांच्या जातीच्या निकषाप्रमाणे आरक्षण मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X