कल्याण : घनकचरा उचलण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेली अन्यायकारक करवाढ रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली असून, हि करवाढ त्वरित कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी महानगरपालिकेला दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून कचरा उचलण्यासाठी प्रति दिन दोन रुपये वाढ कर पावती मध्ये केली आहे. त्यात दोनशे टक्के शास्ति नवीन कर धारकास भुर्दंड महापालिकेने केलेला असतानाच आता प्रती दोन रुपये म्हणजे वर्षाला सातशे तीस रुपये भुर्दंड करापोटी महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना सोसावा लागणार आहे. आधीच लॉक डाऊन मुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांना ही करवाढ अन्याय असल्याने महापालिकेने केलेली सदरची करवाढ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी केली आहे.दरम्यान हि अन्यायकारक करवाढ त्वरित रद्द न केल्यास रिपाईतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील वक्ते यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.