नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी– दि. १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम. मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पत्रान्वये कळविण्यात आले आहे. यानुसार पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करावयाच्या आहेत. तसेच १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघातील मतदारयादया नव्याने तयार करण्याबाबतचा घोषित केलेला कार्यक्रम
मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करणे- दि. ३० सप्टेंबर, २०२३ (शनिवार). मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी- दि. १६ ऑक्टोबर, २०२३ (सोमवार). मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिद्धी- दि. २५ ऑक्टोबर, २०२३ (बुधवार), नमुना १८ व्दारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख- दि. ६ नोव्हेंबर, २०२३ (सोमवार). हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदारयाद्यांची छपाई- दि. २० नोव्हेंबर, २०२३ (सोमवार).
प्रारूप मतदारयाद्यांची प्रसिध्दी- दि. २३ नोव्हेंबर, २०२३ (गुरुवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- दि. २३ नोव्हेंबर, २०२३ (गुरुवार) ते दि. ०९ डिसेंबर २०२३ (शनिवार), दावे व हरकती निकाली काढण्याची तारीख, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दि. २५ डिसेंबर, २०२३ (सोमवार), मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी- दि. ३० डिसेंबर, २०२३ (शनिवार).
कोकण पदवीधर मतदारसंघाचे विभागीय आयुक्त कोकण, कोकण विभाग, नवी मुंबई हे मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हाधिकारी, ठाणे हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची पदर्निदेशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयादीत नाव नोंदविणे याकरिता पात्र व्यक्तीने (१ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची पदवीधर किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती) फॉर्म नमुना नंबर १८ चा अर्ज व संबंधित कागदपत्रे जोडून ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये जमा करावा तसेच राजकीय पक्ष, जागरूक नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन श्री. अशोक शिनगारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.