प्रतिनिधी.
मुंबई – राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले आहेत.
पंढरपुरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सकाळपासूनच आढावा घेणे सुरु केले. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच, त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहे
Related Posts
-
सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्री यांच्या कडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी- प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून…
-
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित होणार डिजिटल
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि…
-
भूदान व ग्रामदान जमिनींसाठी अभ्यास समिती नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील भूदान व ग्रामदान…
-
कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार- मुख्यमंत्री
मुंबई/प्रतिनिधी - कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील…
-
येवला व निफाड तालुक्यातील कोरोना उपाययोजना याबाबत आढावा बैठक
नाशिक/ प्रतिनिधी - कोरोनाच्या लढ्यात आता नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची…
-
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअर्ज व नुतनीकरणासाठी मुदतवाढ
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
राज्यातील ‘प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा’संदर्भात मंत्रालयात बैठक
मुंबई प्रतिनिधी - कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार…
-
डोमेसाईल दाखल्यावरील INDIA व Citizen of india ही अक्षरे मोठी व गडद करण्याची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - सेतू मधून देण्यात येणार्या डोमेसाईल दाखल्यावरील INDIA…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा; प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती
प्रतिनिधी. मुंबई दि. ७ - देशात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्य सरकारने…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात…
-
नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा
नागपूर/प्रतिनिधी - एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई/प्रतिनिधी – दीपोत्सव, प्रकाश पर्व मंगलमय अशा दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
नवी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - समाजातील सर्व घटकांना न्याय…
-
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
प्रतिनिधी. औरंगाबाद - भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या…
-
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणार
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर…
-
डोंगर उतारांवरील गावे व वस्त्यातील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतरास सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री यांचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे…
-
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास…
-
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा…
-
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मदत
प्रतिनिधी. मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…
-
ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी
ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची…
-
३० व ३१ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
आदिवासी आश्रम शाळा व कर्मचारी यांचे आंदोलन
नेशन न्यूज' मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आदिवासी विकास…
-
मुंबई व किनारपट्टीच्या जिल्ह्यांत झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी – हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत …
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतर्फे अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामाजिक न्याय व विशेष…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा मुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी. मुंबई - बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी…
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात…