महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महत्वाच्या बातम्या मुंबई

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु आहे. सध्या महावितरण कंपनी सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकी वसुली करणे आवश्यक आहे. त्याबाबत वीजग्राहकांना महावितरणची आर्थिक परिस्थिती समजून सांगावी. सुरळीत वीजपुरवठा व अचूक वीजबिलांसह ग्राहकसेवेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तक्रारींचे निवारण योग्य वेळेत झालेच पाहिजे याकडे वरिष्ठांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल, संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत, एमएसईबी होल्डींग कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सद्यस्थितीत सुरु असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच वीजदेयक व महसूल, वीजहानी, एएमआर मीटर, येत्या कालावधीतील सणासुदीचे दिवस व रब्बी हंगामामध्ये वीजपुरवठ्याचे नियोजन आदींचा आढावा घेण्यात आला.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विजेची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच ग्राहकसेवेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीला आणखी गती देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
उच्चदाबासह २० केडब्लूएपेक्षा अधिक वीजभार असलेल्या सर्व वीजजोडण्यांचे मीटर रिडींग हे अॅटोमॅटीक मीटर रिडींग (एएमआर)द्वारे घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीजबिलासंबंधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी नादुरुस्त मीटर बदलून देणे, देयक दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी आदी प्रक्रिया तत्परतेने करण्यात याव्यात. ग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे व त्यासाठी स्थानिक कार्यालयांनी दक्ष राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी व इतर वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निवारण करून त्यासंबंधीची माहिती त्यांना अवगत करण्यात यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

या आढावा बैठकीस मुख्यालयातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर महावितरणचे क्षेत्रीय सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »