नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे , या पार्श्वभूमीवर राज्याची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीला प्रांताधिकारी शैलेश हिंगे ,तहसीलदार धीरज मांजरे अनुपस्थित राहिल्याने आमदार थोरात यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला .
आम्हीही मंत्री राहिलो, महसूल मंत्री राहिलो, मात्र कधी शिर्डीचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना घेऊन बसलो नाही एवढी महत्त्वाची तालुक्यात वर्षातली एक टंचाई आढावा बैठक असताना देखील महसूलमंत्र्यांकडे प्रांतअधिकारी, तहसीलदार ,बैठकीला येत नाही खेदाची बाब आहे.