नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर झालेल्या अन्यायाचे पडसाद सर्वत्र उमटले. ज्या जिल्ह्यात घटना घडली तिथे देखील संतप्त जमावाने निषेध व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकाची बस जाळण्यात आली होती. त्यानंतर बस प्रशासनाने बस न पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
मराठा आंदोलकांशी चर्चा सुरूअसल्यामुळे पुढे वातावरण शांत झाले आहे त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बस पाठवत असल्याचे आगर प्रमुख संतोष घाणे यांनी सांगितले आहे. अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली बस सेवा संभाजी नगर वरून बीड, जालना, बुलढाणा, अकोला, नागपूर, नांदेड, पुणे, नगर, नाशिक या भागांमध्ये बस सोडण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती आगार प्रमुख यांनी दिली आहे.