प्रतिनिधी.
मुंबई – कोरोनाने महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. संपूर्ण जगावर कोरोना मुळे भीतीचे सावट पसरले आहे. या महामारीत डॉक्टर, नर्सेस,पोलिस त्याच बरोबर विविध विभागातील सरकारी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा ना करता कोविड १९ बरोबर दोन हात करत आहे. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचे हि योगदान मोठ्या प्रमाणात आहे. बृहन्मुबई महापालिकेचे कोरोना महामारीचा सामना मार्च पासून आज पर्येंत महापालिकेतील कामगार , कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जीवाची बाजी लावून करीत आहे. त्यात ते आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता चोख व प्रामाणिक पणे आपली सेवा बजावत आहे. आणि त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास यश आले आहे.
बृहन्मुबई महापालिकेचा सफाई विभाग,पाणी विभाग, आरोग्य विभाग, कीटक नाशक विभाग त्याच बरोबर महापालिकेचे एकून ५८ विभाग अखंडित सेवा देऊन कोरोना महामारीशी लढत आहे. त्या मुळे हेच खरे कोरोना योध्ये ठरले आहे. अशा कोरोना योद्ध्यांना महापालिकेच्या वतीने त्यांनी केलेल्या कामाचे प्रतिक म्हणून त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात द्यावा व त्यांच्या कामाचा गौरव करण्यात यावा त्यांना सम्मानीत करण्यात यावे. अशी विनंती मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने माननीय महापौर बृहन्मुबई महापालिका व बृहन्मुबई महापालिका आयुक्त यांना पत्रक देऊन करण्यात आली आहे