महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकबाबत तक्रारीसाठी व्हॉटसअप क्रमांकावर संपर्काचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले रेतीगट दक्षता पथक क्र. ०१ व ०२ यांचे मार्फत नागरीकांसाठी अवैध गौणखनिज उत्खनन / वाहतूकीबाबत तक्रारी करण्यासाठी दोन व्हॉटसअप हेल्पलाईन क्रमांक कार्यरत करण्यात आले आहे.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळल्यास नागरिकांनी या व्हॉटसअप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांनी केले आहे.

अवैध गौण खनिज उत्खननन व वाहतुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक - संजय बा. जाधव (दक्षता पथक क्र. ०१) :- ९३२४९७८०२०, सचिन बु. भोईर (दक्षता पथक क्र. ०२) :- ७०३०६७३६८८.

नागरीकांनी अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळून आल्यास वरील क्रमांकावर माहिती पाठवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×