नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे – कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या जागेवर पालिकेचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याला तसेच ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँडची जागा भूमिगत पार्किंगसाठी द्यायला परिवहन विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँडच्या जागेवर भूमिगत पार्किंग उभारण्यासाठीही ते आग्रही होते. या अनुषंगाने आज पुन्हा बैठक पार पडली. याबाबत यापूर्वी झालेल्या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांचा सुधारित विकास आराखडा परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. त्यावेळी या दोन्ही योजनांना जागा देण्यासाठी तत्वतः मंजुरी देताना एसटीची गरज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून त्यांनतरच हे भूखंड विकसित करायला परवानगी देऊ असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र बसून महामंडळाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार सुधारित आराखडा परिवहन मंत्र्यांसमोर सादर केला. यातून परिवहन महामंडळाची गरज आणि ठाणे महानगरपालिकेचे हित दोन्ही साध्य होत असल्याने या प्रकल्पांना जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवणे तसेच स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांना पुरेसे पार्किंग उपलब्ध करून देणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे बनले होते. आज परिवहनमंत्र्यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याने हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करणे शक्य होईल असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि नगरविकास, एसटी आणि ठाणे महानगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, नटबोल्ट विना धावत होती एसटी
कल्याण प्रतिनिधी- कल्याण शीळ रोडवरील मानपाडा रोड वर घडलेल्या एका…
-
कल्याण एसटी डेपोत कामगारांचा संप
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचितचा पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु
प्रतिनिधी. मुंबई - राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक…
-
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर…
-
एसटी आणि बुलेटचा भीषण अपघात,तीन मित्राचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टिम. बीड - अहेर वडगाव या ठिकाणाहून…
-
नाशिकच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचा खुलासा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
एसटी स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि.…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या…
-
आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये - राज ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - करोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे…
-
कळवा पोलिसांकडून मोटार सायकल चोर जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - फिर्यादीनी दिलेल्या…
-
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम मुंबई,- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य…
-
गोळीबाराच्या घटनेने कळवा हादरले,पतीने गोळ्या झाडत स्वतःसह पत्नीला संपविले
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - गोळीबाराच्या घटनेने…
-
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात…
-
एसटी महामंडळाच्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये होणार रुपांतर
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या…
-
कल्याण थोरगव्हाण एसटी बससेवा सुरु,जळगाव जिल्हातील प्रवाशांना होणार लाभ
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोतून कल्याण ते थोरगव्हाण…
-
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती निवड चाचणीत एसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री
मुंबई/प्रतिनिधी - विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत…
-
स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आम्ही स्वतंत्र लढलो,…
-
बॅग,मोबाईल ठेवण्यासाठी जागा नाही, कामगारांनी मतदान न करने केले पसंत
NATION NEWS MARATHI ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील…
-
आम्हाला जागा उपलब्ध करून द्या,अन्यायकारक कारवाई थांबवा - खासगी बसमालकांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर…
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र…
-
भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी- कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य…
-
संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाचा कोणताही निर्णय नाही – एसटी महामंडळ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधी रूपयांचे…
-
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला येणार बळकटी,रुग्णालयासाठी ५ एकर जागा देण्याचा झाला निर्णय
मुंबई/प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी…
-
कल्याणातील महापालिका मुख्यालय, एसटी डेपो, कोर्ट स्थलांतराच्या विरोधात राष्ट्रवादीची सह्यांची मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सद्या स्मार्ट…
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात शासनाने केली वाढ, दरमहा वेतनाची हमी राज्य शासन घेणार
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप…
-
राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई/प्रतिनिधी - पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा…
-
कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख आर्थिक मदत
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र २०२३ साठी १,५४,३९२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन…
-
मोदीजींनी अर्ज भरला तरी ही जागा राजन विचारे मोठ्या लीडने काढतील-सुषमा अंधारे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - आनंद दिघेंच्या नावाने…
-
कल्याण मन पिळवटून टाकणारी घटना; ३ वर्षांच्या चिमुरड्यासह गर्भवतीने कळवा ते कल्याण अंतर रेल्वे ट्रेक वरून चालत गाठले
प्रतिनिधी . कल्याण - कल्याणातील ८ महिन्यांच्या एका गर्भवती महिलेने…