Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कल्याणच्या पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,हरवलेले २० मोबाईल केले नागरिकांना परत

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी परत केले आहेत. मोबाईल परत करण्याची प्रक्रीया सुरुच आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल मोठय़ा प्रमाणात हस्तगत केले आहेत. नागरीकांना हे मोबाईल परत केले जात आहेत. कोरोना काळात वीस वीसच्या टप्प्यात हे मोबाईल परत करण्याचे काम सुरु आहे. आज खडकपाडा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी २० मोबाईल कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहे.

कल्याण खडक पाडा परिसरातील  सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले  व हारवलेले पाच लाख पंचवीस हजाराचे मोबाईल स्थानिक खडक पाडा पोलीसाच्या  पथकाने शोधले आहेत. खडक पाडा पोलीस अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस संयुक्त अनिल पोवार व खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अशोक पवार यांही पोलीस स्थानकात एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.या पथकात कार्यरत असलेल्या हवालदार सुनिल पवार व कॉन्स्टेबल कुशाल जाधव यांनी मोबाईलचा तांत्रिक  पद्धतीने शोध घेत ठाणे जिल्ह्याच्या विविध ठिकाण हुन ५२ मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X