नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – केंद्रीय माहिती आणि प्रसारण व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात “चल मन वृंदावन” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने यासाठी साहाय्य केले असून मथुरा मतदार संघाच्या खासदार हेमा मालिनी, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, “चल मन वृंदावन”चे लेखक व संपादक डॉ. अशोक बन्सल आणि बिमटेकचे (BIMTECH-बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी) संचालक व “चल मन वृंदावन” पुस्तकाचे प्रकाशक डॉ. हरिवंश चतुर्वेदी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
“चल मन वृंदावन” हे पुस्तक जागतिक स्तरावर प्रसिद्ध मंदिर आणि नगर वृंदावनच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवते. हे पुस्तक या प्रदेशाची ओळख प्रस्थापित करणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि ऐतिहासिक घटनांचे स्मरण जागवते.
खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखाली कॉफी टेबल बुकच्या निर्मिती चमूचे अनुराग सिंह ठाकूर यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “ब्रजचे सांस्कृतिक वारसा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि विशाल आहे. पुस्तकाची विभागांवार रचना स्पष्टता आणि समजण्यास सोपा आशय सुनिश्चित करते. विद्वान, पर्यटक आणि ब्रजविषयी प्रत्यक्ष जाणून घेणाऱ्या प्रवाशांमध्ये या पुस्तकाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ” या कार्यक्रमादरम्यान फॅशन शो आयोजित केल्याबद्दलही ठाकूर यांनी निर्मिती चमूचे अभिनंदन केले.