Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवली स्फोट दुर्घटनेत बेपत्ताचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची फरपट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली मधील केमिकल कंपनीत झालेल्या भयानक बॉयलर ब्लास्टमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 65 हून अधिक जखमी झालेल्या रुग्णांमधून 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्यापही काहींना अजूनही आपले मृत नातेवाईक सापडले नाहीत.

एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाची टीम गेल्या दोन दिवसांपासून घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. आज सकाळीही काही मानवी अवशेष सापडले आहेत. दुसरीकडे, या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का? याची खात्री नसल्याने कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे कुटुंब हताश झाले आहे.

अजूनही आपला बाप,भाऊ मुलगा सुखरूप परत येईल अशा हताश नजरेने नातेवाईक हॉस्पिटल बाहेर फेऱ्या मारत आहे. रुग्णालय, शासकीय हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल आणि पोस्टमार्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकांची शोधाशोध ते करत आहेत. मृत नातेवाईक सापडत नसल्याने त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या नातेवाईकांचा शोध घेणाऱ्याना प्रशासन योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला जात आहे.

Translate »
X