महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण परिमंडलातील ८७ टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येते. कल्याण परिमंडलातील २४ लाख ३६ हजार म्हणजेच ८७ टक्के ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवले आहेत. उर्वरित ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कल्याण परिमंडलात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २८ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास ८७ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठविला जातो. हा ‘एसएमएस’ बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरता येते किंवा दिलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन बिल भरणा करता येतो.

याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना ‘एसएमएस’ मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाला असल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची माहितीही या सुविधेतून मिळते. एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे शक्य नसल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन ॲपद्वारे महावितरणला सादर करण्याबाबत तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचना ‘एसएमएस’द्वारे देण्यात येते.

असा नोंदवा मोबाईल क्रमांक
नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »