कल्याण/प्रतिनिधी – जयपूर, राजस्थान येथे नुकतेच स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने रेफरी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पार पडला. मुळ भारतीय असलेल्या स्मॅश रॅकेट खेळाचे निर्माते आणि फेडरेशनचे सचिव मो. इकराम आणि अध्यक्ष हीरानंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम पार पडला.
भारतातील ग्रामीण भागांतील युवकांना केंद्रस्थानी ठेवुन कमी खर्चात रॅकेट आणि बॉलच्या सहाय्याने शारीरिक आणि मानसिक दृष्टीने परिपूर्ण अशा स्मॅश रॅकेट या खेळाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात भारतातील १४ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबई आणि कल्याणमधील नामदेव येडगे, तुषार वारंग, स्वप्नील शिरसाठ, अविनाश पाटील यांनी हे प्रशिक्षण शिबीर आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केले.
महाराष्ट्रातील युवकांना या खेळांच्या माध्यमाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर आपले कौशल्य दाखवता यावेत यासाठी महाराष्ट्रभर आम्हीं प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर येत्या काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जिल्हा संघटना बांधणी आणि प्रशिक्षण शिबिराचे नियोजन आम्हीं करणार आहोत असे या युवकांना सांगितले.
- September 7, 2021