मुंबई :- बोट अपघातातून प्रसंगावधान राखत ८८ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावल्याने अवघ्या महाराष्ट्राचे रिअल हिरो ठरलेले पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला.
गेट वे हून अलिबागला जाणारी प्रवासी बोट आजंठा मांडव्याजवळ काही अंतरावर बुडत होती. या बोटीत ८८ प्रवासी होते. ही बोट बुडत असताना तेथे मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बोटीतून गस्ती घालत होते. त्यांनी तात्काळ प्रवाश्यांच्या मदतीला धाव घेतली तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खलाश्यांच्या मदतीने पोलीस गस्तीवरील बोटीत आणि अन्य एका प्रवासी बोटीत बसवून किनाऱ्याला आणले.प्रशांत घरत यांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलीस दलाची शान उंचावली आहे असे कौतुकाचे उद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.
आपल्या राज्यातल्या पोलिस हा लोकहित व सुरक्षिततेच्या दृष्टीने किती जागरूक आहे याचे हे सुंदर उदाहरण आहे, असेही गृहमंत्री या प्रसंगी म्हणाले. धाडसी प्रशांत घरत यांचे खूप खूप कौतुक केले. आपल्या प्राणाची पर्वा न करता ८८ प्राण वाचविणारे पोलीस नाईक प्रशांत घरत महाराष्ट्राचे रिअल हिरो ठरले आहेत.त्यांना मानाचा सलाम.