नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर – उसाच्या एफआरपीचे दोन हप्ते करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध रयत क्रांती संघटनेच्या वतीनं १ मार्च रोजी राज्यभर आदेशाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली. जर हा आदेश माग घेतला नाही तर आगामी हंगामात कारखान्यांचे धुरांडं पेटू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. उसाच्या एफआरपीचे दोन हप्ते करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाकडून घेण्यात आलाय .या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून या विरोधात १ मार्च रोजी राज्यभर आदेशाची होळी करून निषेध नोंदविण्यात येणार असल्याचं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
केंद्र सरकारनं एफआरपी एक रक्कमी देण्यासंदर्भात कायदा केला असताना राज्य सरकार या नियमाची पायमल्ली करत असल्याचा आरोप खोत यांनी केला. . या दोन तुकड्यातील एफआरपीमुळं शेतकऱ्याला टना मागं सहाशे ते सातशे रुपये कमी मिळणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. . त्याचबरोबर राज्यभरातील ज्या सहकारी साखर कारखान्यांची खरेदी विक्री कमी दरानं झालीय त्यांची चौकशी होण्यासाठी ईडीकडं कागदपत्रासह तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जर शासनान एफआरपी विषयी घेतलेला हा निर्णय मागं घेतला नाही तर येत्या हंगामात कारखान्यांचे धुरांड पेटू देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.या पत्रकार परिषदेला रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन.डी.चौगुले, भगवान काटे, श्रीकांत घाटगे, दीपक पगार, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार पाटील, बाबासो पाटील-भुयेकर आदी उपस्थित होते.