महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी राजकीय

नौटंकी करून वोट मिळणार नाही,रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज अमित शाहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण या सभेमुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. या वादाला कारण आहे ते अमरावती मधील सायन्स कोर मैदान. राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे अमरावतीच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणा यांनी पत्रकरांशी संवाद साधला ते म्हणाले “अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता. ते सांस्कृतिक भवन मी आधीच बुक केलं होतं. मात्र, शरद पवार व उद्धव ठाकरे येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आले. तसेच आम्ही परतवाडा येथे योगिंच्या सभेसाठी आम्ही बुक केलेले ग्राउंड राहुल गांधींच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना सभेसाठी देण्यात आले. देशाच्या गृहमंत्र्यांचा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला होता. तुम्ही जनतेच्या दरबारात लढा, लोक अशी नौटंकी करून तुम्हाला वोट करणार नाही. जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसा आधीच अर्ज दिलेला होता. मात्र, तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळवून घेतले” असा आरोप रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर केला.

रवी राणांनी बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर रवी राणा म्हणाले “बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो. ज्या थाली मध्ये खातो त्यात थाली मध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत आहेत.” असा आरोप रवी राणांनी बच्चू कडू यांना टोला लागवला. तसेच बच्चू कडू यांच्यासोबत लोकशाही मार्गाने कायदेशीर लढाई करण्यास मी तयार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

Translate »
×