महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यात रावणाचे मंदिर,३०० वर्षापासून केली जाते रावणाची पुजा

नेशन न्यूज मराठी टीम.

अकोला/प्रतिनिधी – अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे,यात आश्चर्य ते काय ? परंतु,अकोला जिल्ह्यातील सांगोळा त्याला अपवाद आहे.रावणाच्या सद्गुणांमुळे येथे रावनाची पूजा केली जाते.तर या गावात तब्बल 300 वर्षां पासून ही परंपरा आजही जोपासली जात आहे. तर वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे,अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे.याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते.

पातूर तालुक्यातल्या वाडेगाव नजीक सांगोडा हे गाव आहे.गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे.हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थानही आहे. तपस्वी,बुद्धिमान,शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते.हे रावणाचे मंदिर जिल्हातले नव्हे तर राज्यातले एकमेव असल्याचे बोललं जाते.

महापंडित रावणाची लंका नगरी अकोला पासून हजारो किलो मीटर दूर आहे,पण अकोला जिल्हातल्या सांगोड़ा या गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमाने पूजा केली जाते,गेल्या 300 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती.त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. तर ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले.पण त्याच्या हातून घडली ती दशाननरावणाची ही मूर्तीदहा तोंडे,20 डोळे,20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती,हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. संपूर्ण महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाला दहन केले जाते.पण या गावात रावणाची पुज्या केली जाते.तर विशेष म्हणजे पिढ्यानपिढ्या ही परंपरा जोपासण्याचं काम या गावातील नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×