नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथे विठ्ठल रुक्माई सेवा मंडळातर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त नौकानयन स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सगळ्यांचाचं आकर्षणाचा विषय ठरत आहे. या स्पर्धेत पंचक्रोशीतील 11 संघांनी सहभाग नोंदवला.4 राउंड मध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली.
कोरोना अगोदर सलग 4 वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. कोरोना काळात ही स्पर्धा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोना नंतर प्रथमचं या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना चे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. तसेच या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली गेली नसून स्पर्धक नौका चालवत होते. या स्पर्धेला पूर्णगड पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक हे परीक्षक म्हणून लाभले असून ही स्पर्धा मुचकुंदी नदीच्या पात्रात खेळवली गेली. अशी स्पर्धा भरवण्याचे गावडे आंबेरे (खरविवाडा ) हे एकमेव गाव आहे.