नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – अत्रे नाट्यगृहामध्ये मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे उपस्थित झाल्या होत्या. कार्यक्रम ठिकाणी रश्मी ठाकरेंचे आगमन होताच ” बाईपण भारी देवा ” या गाण्यावर ठेका धरत कल्याण मधील महिलांनी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. रश्मी ठाकरे यांनी देखील ठेका धरत महिलांचा उत्साह वाढविला,
कल्याण मध्ये रश्मी ठाकरेंचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ठाकरे गटाच्या महिला व पुरुष कार्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित श्रावण सरी या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे कल्याणमध्ये दाखल झाल्या होत्या