नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. तिसरी लाट येऊ नये म्हणून कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर हे स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना व दुकानदारांना मास्क चा वापर करावा तसेच, शासनाने नेमून दिलेल्या करोना नियमांचे पालन करावे अशाही सूचना त्यांनी दुकानदार आणि नागरिकांना दिल्या आहे. यावेळी ज्या नागरिकांच्या तोंडाला मास्क नाही. अशा नागरिकांना त्यांनी मास्कचे वाटपही केले.
पुनः एकदा कोरोंनाने आपले डोके वर काढले असून कोरोंना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. गेल्यावर्षी रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. ही परिस्थिती पुनः ओढावु नये म्हणून आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पश्चिमेतील मार्केटचा आढावा घेत, दुकानदार, नांगरिकाना हात जोडून मास्क वापरण्याचे आणि विनामास्क ग्राहकांना दुकानात न घेण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांनी मास्क परिधान केले नव्हते त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह कल्याण शहर संघटक अरविंद मोरे, कल्याण उपशहर प्रमुख रवी पाटील, युवासेना उपजिल्हा अधिकारी अभिषेक मोरे, जेष्ठ शिवसैनिक रवींद्र कपोते, मोहन नाईक आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.