नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
भिवंडी/प्रतिनिधी – देशभरात आज मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. दिल्लीच्या जामा मशीद आणि फतेहपुरी मशिदीच्या इमामांनी दिल्लीसह देशभरात चंद्र दिसल्याची पुष्टी केली. चंद्रदर्शनानंतर लोकांनी ईदची उरलेली तयारी सुरू केली. त्यामध्ये लोक अत्तर, टोप्या, शेवया आणि इतर सुका मेवा खरेदी करताना दिसले. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद भिवंडी शहरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भिवंडी शहरातील सुमारे 113 मशिदींमधून लाखों मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. लहान मुलांपासून सर्वांमध्ये या निमित्ताने विशेष उत्साह दिसून आला.सकाळी 07 वा. विविध मशिदींमध्ये विशेषतःपटेल कंपाऊंड, धामणकर नाका, अस्बी, गैबी नगर, शांतीनगर, ईदगाह, रोशन बाग, नागाव, दिवाणशहा, भुसार मोहल्ला, निजामपुरा, सौदागर मोहल्ला येथे ईद उल फित्रची नमाज अदा सुरू झाली, त्यामुळे या सणाच्या निमित्ताने उत्साह दिसून आला. शेवटी मुख्य नमाज कॉटरगेट येथील सुन्नी मशिदीत सकाळी साडेआठ वाजता अदा करण्यात आली.
यानंतर डीसीपी, क्राईम डीसीपी पराग मणेरे, विद्या देशमुख ठाणे जॉइंट सीपी यांनीही नमाज्यांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून श्वानपथकामार्फत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनीही रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.