नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – ठाण्यातील अभिनय कट्टा येथे दीव्यांग बांधवांनी पोलिस बांधवांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने विशेष असे रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधन हा बहीण भाऊ यांच्यातील अतूट नात व्यक्त करणारा असा हा सण ,अशातच अभिनय कट्टा येथे किरण नाकती यांनी विशेष मुलांचे विशेष रक्षाबंधन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमांतर्गत सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर असलेल्या पोलिस बांधवांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नौपाडा पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ आणि सहायक पोलिस प्रिया ढाकणे यांची उपस्थिती लाभली.
दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिया ढाकणे यांनी विशेष मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले तर दिव्यांग केंद्रातील मुलींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना राखी बांधली .यावेळी या मुलांमध्ये उत्साह आणि आनंद दिसून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिया ढाकणे यांनी या कार्यक्रमाला बोलविल्याबद्दल किरण नाकती यांचे कौतुक केले तसेच मुलाच्या कलागुणांचे चे ही विशेष कौतुक केले.तसेच सणाच्या दिवशीही काम करण्याची संधी मिळाली असून नागरिकांची सेवा त्यातून होते.असे प्रिया ढाकणे यांनी म्हटले.
तसेच या रक्षाबंधनातून पोलिस आणि विशेष मुले यांच्यामध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले असून पोलिस बांधव आपल्या संरक्षणासाठी तत्पर असून त्यांच्याबाबत एक आपुलकी ची भावना निर्माण होते असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी म्हटले आहे.